उदगीर/ प्रतिनिधी
अखिल भारतीय श्री.स्वामी समर्थ गुरुपीठ श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर द्वारा संचलित श्री.स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा व बालसंस्कार मुख्य केंद्राच्या वतीने साक्षात परब्रम्हस्वरूप गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने व गुरुपुत्र दादासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षय तृतीया सणाचे औचित्य साधून उदगीरातील देगलूर रोड लगत असलेल्या विकास नगर एल.आय.सी ऑफिसच्या मागच्या नगरात ग्राम अभियान कार्यक्रमाचे सोन्या मारुती मंदिरात आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाचा उदगीर शहरातील व परिसरातील सर्व भाविक-भक्त, सेवेकरी, कार्यरत सेवेकरी,सर्व विभागाचे प्रतिनिधी उपस्थित रहावे असे आवाहन सचिन बामनपल्ले, निवृत्ती जवळे, सुनीता हंडरगुळे यांच्यासह समर्थ सेवेकरी यांनी केले आहे.
0 Comments