उदगीर/प्रतिनिधी उदगीर:तालुक्यातील गुडसुर येथील एकनाथ तुकाराम गोतावळे यांनी त्यांच्या ताब्यातील त्यांच्या हिशाची मालकी हक्काची जमीन सर्वे नंबर 107/2/1 क्षेत्र 1 हेक्टर 94 आर जमीनीची विक्री प्रताप दादाराव पाटील,सय्यद सरदारअल्ली,शेख वजीर महेबूब बंगाली याना एकत्रित रित्या लावलेल्या उसाच्या पिकासह नोंदणीकृत खरेदीखत क्रमांक 3204/2021 नुसार विक्री केली,व वाटणीचा दस्त क्रमांक 2036/2014 प्रमाणे फेरफार क्रमांक 2067 मंजूर होवून सातबारा उताऱ्यावर नोंद झाली,उपोषण कर्ते एकनाथ तुकाराम गोतावळे यांनी जमीन विक्री केल्यामुळे उपोषण कर्त्याचा मोठा भाऊ नामदेव तुकाराम गोतावळे यांनी बेकायदेशीर रित्या रकमेची मागणी करून मानसिक त्रास देत असून जमीन खरेदीखत करणाऱ्याना दबाव टाकून आट्रासिटीचा व इतर खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत आहे,बेकायदेशीर रकमेची खंडणी मागणाऱ्या या गुंड प्रवृत्तीच्या नामदेव तुकाराम गोतावळेवर कार्यवाही करावी या मागणीसाठी 8 मे रोजी एकनाथ तुकाराम गोतावळे यांनी कुटुंबासह आमरण उपोषण सुरू केले आहे
0 Comments