Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

हडफसर काझीपेठ रेल्वेत 83 वर्षीय वृद्ध मृतावस्थेत आढळला उदगीर रेल्वे पोलिसांनी घेतला ताब्यात

हडफसर काझीपेठ रेल्वेत 83 वर्षीय वृद्ध मृतावस्थेत आढळला उदगीर रेल्वे पोलिसांनी घेतला ताब्यात

उदगीर/प्रतिनिधी
उदगीर:हडफसर काझीपेठ रेल्वेत 83 वर्षीय वृद्ध व्यक्ती मृत अवस्थेत आढळून आल्याची घटना घडली आहे. रेल्वे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हडफसर काझीपेठ रेल्वेत एक पुरुष जातीचा वृद्ध व्यक्ती मृत अवस्थेत आहे अशी माहिती 31 ऑक्टोबर रोजी लातूर रेल्वे स्टेशन येथून उदगीर रेल्वे पोलिसांना देण्यात आली,उदगीर रेल्वे स्टेशनवर गाडी क्रमांक 17013 हडफसर काझीपेठ ही रेल्वेगाडी उदगीर स्टेशनवर येऊन थांबताच उदगीर रेल्वे पोलिसांनी सदरील मृतदेह ताब्यात घेऊन उदगीर येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरानी तपासणी करून मृत घोषित केले, सदर वृद्ध व्यक्तीची उदगीर रेल्वे पोलिसांनी ओळख पटवली असता त्याचे नाव गोविंद रुस्तुम कदम वय 83 वर्ष राहणार शिव झेरॉक्स सेंटर जवळ मागणपूरा नांदेड येथील असल्याचे निष्पन्न झाले,सदर मृतदेहाचा रेल्वे पोलीस कर्मचारी डफडे व घोरपडे यांनी पंचनामा केला , व शवविच्छेदन करून प्रेत मयताचा मुलगा हणमंतराव गोविंदराव कदम वय 42 वर्ष राहणार नांदेड यांच्या ताब्यात देण्यात आले.

Post a Comment

0 Comments

जाहिरात