Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

लातूर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावरील अवैध पार्किंगविरोधात विशेष संयुक्त कारवाई मोहीम

लातूर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावरील अवैध पार्किंगविरोधात विशेष संयुक्त कारवाई मोहीम

लातूर, जिल्ह्यात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार व परिवहन आयुक्त यांच्या आदेशान्वये राष्ट्रीय महामार्गावरील अवैध पार्किंगविरोधात विशेष संयुक्त कारवाई मोहीम राबविण्यात येत आहे. राष्ट्रीय महामार्गावर अवैधरित्या उभी राहणारी जड व हलकी वाहने अपघातांचे प्रमुख कारण ठरत असून रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर असल्याने, लातूर प्रादेशिक परिवहन कार्यालय, जिल्हा पोलीस, महामार्ग पोलीस, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) व संबंधित विभागांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.

या मोहिमेंतर्गत राष्ट्रीय महामार्ग क्र. एनएच-361 (उजनी-लातूर-टोल प्लाझा आष्टा-माळेगाव), एनएच-63 (लातूर-मुरुड-नळेगाव-टाकळी/देगलूर रोड), एनएच-548बी (किल्लारी-औसा टी पॉईंट-लातूर-लखमापूर), एनएच-752 के (निलंगा-औराद) आणि लातूर शहर परिसरातील राष्ट्रीय महामार्गांवर विशेष तपासणी व कडक कारवाई करण्यात येत आहे. विविध महामार्गांवर अवैध पार्किंग करणाऱ्या वाहनांवर लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नियमानुसार दंडात्मक कारवाई केली जात आहे. संबंधित वाहनचालक व मालकांना वाहने केवळ सुरक्षित आणि अधिकृत ठिकाणीच उभी करण्याबाबत स्पष्ट सूचना देण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर, सर्व वाहनचालकांनी राष्ट्रीय महामार्गावर कोणत्याही परिस्थितीत अवैध पार्किंग करू नये, अन्यथा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोटार वाहन कायदा व इतर संबंधित कायद्यांनुसार कठोर कारवाई केली जाईल, असे आवाहन लातूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अमरसिंह गवारे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments

जाहिरात