डोंगरशेळकी येथे ट्रॅक्टरच्या धडकेत ७८ वर्षीय वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
उदगीर तालुक्यातील डोंगरशेळकी येथे ३० एप्रिल रोजी पहाटे पाच ते सहा वाजेच्या दरम्यान दुर्दैवी अपघात घडला. ट्रॅक्टरच्या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, संबंधित महिला पहाटेच्या सुमारास आपल्या कामानिमित्त बाहेर पडली असताना भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टरने तिला जोरदार धडक दिली.या अपघातात रसिका बाबुराव केंद्रे वय ७८ या वृद्ध महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. तसेच अपघातग्रस्त ट्रॅक्टर व चालकाबाबत अधिक तपास केला जात आहे.


0 Comments