पोलीस कॉन्स्टेबल शरद जाधव यांच्या उत्कृष्ट कामगिरीचा गौरव
रत्नागिरी : रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथील पोलीस कॉन्स्टेबल शरद जाधव यांनी गुरंन १३४/२०२६ या अवैध गुटखा प्रकरणात उल्लेखनीय कामगिरी बजावत आरोपींकडून तब्बल २७ हजार ९०४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यांच्या तत्परतेमुळे आणि कर्तव्यदक्षतेमुळे अवैध गुटखा विक्रीविरोधातील कारवाईला मोठे यश मिळाले आहे.या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांनी पोलीस कॉन्स्टेबल शरद जाधव यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले.
यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करत, अशा धाडसी आणि प्रभावी कारवायांमुळे समाजात कायद्याबाबत जनजागृती होऊन अवैध व्यवसायांवर आळा बसण्यास मदत होत असल्याचे सांगितले.पोलीस दलातील अशा कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांच्या कामगिरीमुळे रत्नागिरी पोलिसांचा जनतेतील विश्वास अधिक दृढ होत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.


0 Comments