Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

हंडरगुळी पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर,श्रीमती नमृता राजू चौकटे विजयी

हंडरगुळी पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर,श्रीमती नमृता राजू चौकटे विजयी

उदगीर:तालुक्यातील हंडरगुळी ग्रामपंचायत पोटनिवडणुक मतदानाची प्रक्रिया 5 नोव्हेंबर रोजी  तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शांततेत पार पडली प्रभाग क्रमांक चार साठी एकूण  1032 मतदार होते त्यापैकी 789 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला हंडरगुळी वार्ड क्रमांक 4 मध्ये एका जागेसाठी एकूण तीन उमेदवार रिंगणात होते 6 नोव्हेंबर रोजी उदगीर येथील तहसील कार्यालयात मतमोजणीचा निकाल जाहीर करण्यात आला.अनुक्रमे श्रीमती शांताबाई लक्ष्मण गायकवाड  याना 10 मते मिळाली, श्रीमती नम्रता राजू चौकटे यांना 449 मते मिळाली तर श्रीमती शांताबाई रोहिदास वाघमारे यांना 320 मते व नोटाला 10  मते मिळाली या पोटनिवडणुकीत नमृता राजू चौकटे ह्या विजयी झाल्या.यावेळी उदगीरचे निवडणूक नायब तहसीलदार संतोष धाराशिवकर,निवडणूक निर्णय अधिकारी स्वामी विवेकानंद, मतमोजणी सहाय्यक ताटे व नादवटे ,पंकज दंडीमे ,गणेश मोहितकर ,तलाठी तानाजी शिंदे, व पोलीस अधिकारी कर्मचारी मतमोजणीच्या ठिकाणी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

जाहिरात