कै.रमेश पवार प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळाआश्रम शाळेत शालेय विद्यार्थ्यांना फराळ वाटप
प्रतिनिधी/रवी जाधव
उदगीर: नागलगाव बोरतळा तांडा येथे शैक्षणिक वर्षाच्या प्रथम सत्राचा समारोप शालेय विद्यार्थ्यांना दिवाळी फराळ वाटप करून निरोप देण्यात आला.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे अध्यक्ष संजय पवार होते,तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार रवी जाधव,भीमराव कांबळे तसेच मुख्याध्यापक प्रकाश राठोड ज्येष्ठ शिक्षक वामनराव जाधव ,विश्वंभर फावडे,किशनराव जाधव,अविनाश पाटील उपस्थित होते.विद्यार्थ्यांचा व पालकांचा स्नेह दिवाळी निमित्त वृंदीगत व्हावा विद्यार्थी शाळेच्या आठवणीत राहावा म्हणून शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना व पालकाना संजय पवार यांच्या हस्ते अल्पोपहार फराळ वाटप करण्यात आले.आणि विद्यार्थी व पालकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. शाळेच्या उपक्रमाविषयी शाळेतील सहशिक्षक शरद शिंदे यांनी माहिती सांगून सगळ्यांना शुभेच्छा दिल्या, फटाके मुक्त दिवाळी व प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला.यावेळी विद्यार्थ्यांनी जल्लोष करत आनंदाअश्रुनी निरोप घेऊन विद्यार्थी आपल्या मायघरी परतले,यावेळी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
0 Comments