Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचा लातूर जिल्हा दौरा*

*क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचा लातूर जिल्हा दौरा*

लातूर, दि.5 राज्याच्या क्रीडा व युवक कल्याण, बंदरे विभागाचे मंत्री संजय बनसोडे हे सोमवार, 06  नोव्हेंबर, 2023 रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. बनसोडे हे 6 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता लातूर येथून मोटारीने उदगीर तालुक्यातील सताळा बु. कडे प्रयाण करतील. सकाळी 10 वाजता सताळा बु. येथील दिवंगत स्वातंत्र्यसैनिक पंढरीनाथ रामचंद्र तिरुके यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट, सकाळी 11.30 वाजता मौजे नेत्रगाव येथील दिवंगत जीवन समर्थराव पाटील यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देतील. दुपारी 12.30 वाजता उदगीर शहरातील रिंग रोड येथील ओम गार्डन फंक्शन हॉल येथे बालाजी रामदास पाटील यांच्या मुलाच्या साखरपुडा कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी 12.45  वाजता उदगीर शहरातील समता नगर येथील दिवंगत शांताबाई बाबुराव शिवशेट्टे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देतील. 
ना. बनसोडे हे दुपारी 1.15 वाजता देगलूर रोडवरील दिवंगत पुरुषोत्तमशेठ शिवरामशेठ मांगुळकर यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देतील. दुपारी 1.45 वाजता मौजे सोमनाथपूर येथील दिवंगत सारजबाई नारायणराव पाटील यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देतील. दुपारी 2.30 वाजता उदगीर शहरातील रिंग रोड येथील गणेश मंगल कार्यालयात संजय मुंडकर यांच्या मुलीच्या साखरपुडा कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी 2.45 वाजता उदगीर शासकीय विश्रामगृह येथे राखीव. दुपारी 4.45 वाजता उदगीर शहरातील हनुमान कट्टा रोडवरील पुदाले कॉम्प्लेक्स येथील अनिल पुदाले यांच्या आरोही कलेक्शनला सदिच्छा भेट देतील. सायंकाळी 5.15 वाजता किल्ला गल्ली येथील दिवंगत बाबुराव यशवंत चव्हाण यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देतील. सायंकाळी 5.30 वाजता उदगीर येथून लातूरकडे प्रयाण करतील. रात्री 10.30 वाजता लातूर येथून मुंबईकडे प्रयाण करतील.

Post a Comment

0 Comments

जाहिरात