चांदेगाव पाटी जवळ दुचाकीचा अपघात,दुचाकीस्वार जागीच ठार
उदगीर:तालुक्यातील चांदेगाव पाटी जवळ उदगीर देगलूर रोडवर दुचाकीचा अपघात झाल्याची घटना 4 नोव्हेंबर रोजी रात्री घडली आहे, सूत्रांनी दिलेली माहिती अशी की उदगीर देगलूर रोडवर चांदेगाव पाटीजवळ दुचाकी क्रमांक एम.एच 24 पी 8198 या दुचाकीचा अपघात झाला या अपघातात शुक्रराज शिवाजी लिंबोळे राहणार हतराळ ता मुखेड जिल्हा नांदेड हा दुचाकी स्वार जागीच ठार झाला या घटनेची माहिती उदगीर ग्रामीण पोलिसांना समजताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्रीमंगल व बिट जमादार पोलीस हेडकन्स्टेबल धुळशेट्टे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, हा अपघात कसा झाला याचे कारण मात्र समजू शकले नाही
0 Comments