Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

शिरूरअनंतपाळ शहर ओबीसी काँग्रेस सेलच्या अध्यक्षपदी बाबुराव तोरणे

शिरूरअनंतपाळ शहर ओबीसी काँग्रेस सेलच्या अध्यक्षपदी बाबुराव तोरणे

निलंगा:-महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मा.अशोक शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते शिरूरअनंतपाळ ओबीसी सेल  काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी बाबुराव तोरणे यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक लक्ष्मण बोधले अशोकराव पाटील मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रा.दयानंद चोपणे,निलंगा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल सोनकांबळे,शिरुरअनंतपाळचे पत्रकार अरुण हांडे उपस्थित होते.यावेळी बोलताना अशोकराव पाटील निलंगेकर म्हणाले की,सध्या केंद्रातील सरकार व राज्यातील सरकार ओबीसी समाजासाठी कोणत्याही योजना राबवत नसून सध्या जातीपातीचे राजकारण होत आहे.त्यासाठी सर्व ओबीसी समाज बांधवांनी धर्मनिरपेक्ष विचाराचे राजकारण करून सत्ता परिवर्तन करणे गरजेचे आहे.यासाठी महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांचे विचार सामान्य माणसापर्यंत रुजविने व आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र डॉ.शिवाजीराव पाटील,विलासराव देशमुख,शिवराज पाटील चाकूरकर यांनी केलेल्या विकास कार्याला उजाळा देण्याचे कार्य करावे असे ते म्हणाले.

Post a Comment

0 Comments

जाहिरात