बस्थानकासमोर एसटी चालकास मारहाण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
उदगीर:शहरातील एसटी बस्थानकासमोर एसटी बस चालकांस मारहाण झाल्याची घटना घडली आहे,पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की उदगीर शहरातील एसटी बस्थानका समोर एसटी बस चालकांने बस्थानकाकडे एम.एच. 20 बी.एल.2839 ही एसटी बस वळवत असताना मॅजिक टेम्पो क्रमांक एम.एच. 24 ए.बी 6878 च्या चालकांने एसटी बस समोर येऊन एसटी बसचालकांस खाली ओढून तू मला पुढे का जाऊ दिले नाहीस म्हणून शिवीगाळ करून लाथा बुक्यांने मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला अशी फिर्याद एसटीचालक विद्यानंद हनुमंतराव देवनाळे यांनी उदगीर शहर पोलीस ठाण्यात दिल्यावरून मॅजिक टेम्पो क्रमांक एम.एच. 24 ए.बी. 6878 च्या चालकांवर गुरंन 318/23 कलम 353,332,323,504,भादवी प्रमाणे 15 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे,पुढील तपास पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक अभिजित कुदळे हे करीत आहेत.
0 Comments