चिल्लरगे गल्लीत चौघांनी एकास काठीने केली मारहाण,शहर पोलिसांत गुन्हा नोंद
उदगीर:शहरातील चिल्लररगे गल्लीत चौघांनी एकास काठीने मारहाण केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की उदगीर शहरातील चिल्लरगे गल्लीत आरोपीने संगनमत करून फिर्यादीच्या घराच्या दरवाजावर लाथ मारून घरात प्रवेश करून शिवीगाळ करून हातातील लाकडाच्या काठीने पाठीवर मारहाण केली,व कानावर हाताच्या चापटाने व लाथाबुक्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.अशी फिर्याद महेश गुंडप्पा शाहीर यांनी उदगीर शहर पोलीस ठाण्यात दिल्यावरून चौघा आरोपीवर गुरंन 317/23 कलम 452,324,323,504,506,34,भदवी प्रमाणे 15 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांच्या आदेशाने पोलीस हेडकॉन्स्टेबल गायकवाड हे करीत आहेत.
0 Comments