रेडयाची झुंज लावणे आले अंगलट आयोजकांवर उदगीर शहर पोलिसांत गुन्हा दाखल.
उदगीर:शहरात दिवाळी पाडव्या निमित्त १५ नोव्हेंबर रोजी 2 वाजेच्या सुमारास फुले नगर येथील संग्राम शाळेचे मैदान उदगीर येथे रेडया रेडयामध्ये झुंज लावून त्यांना - दुखापत, वेदना व यातना होतील याची माहीती असुनही जाणीवपूर्वक रेडयाची झुंज लावून मा. न्यायालयाच्या आदेशाचा भंग करणारे अयोजक १) बालाजी मारोती निलंगकर रा. परकोट्टे गल्ली उदगीर २) राम पडीले रा. ब्राम्हण गल्ली उदगीर ३) अविनाश राठोड रा. सोमनाथपुर उदगीर ४) शिवाजी बापुराव निलंगकर ५) श्रीनिवास शिवाजी निलंगकर दोघे रा. ब्राम्हण गल्ली उदगीर व इतर पाच ते सहा लोकांवर उदगीर शहर पोलीस ठाण्यात पोलीस कायद्यानुसार पोलीस कर्मचारी निखील शिवाजी बुकटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कलम १८८ भारतीय दंड सहिता सह प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनीयम १९६० चे कलम ११
(१)(a) (n) (m) (11) व महाराष्ट्र पोलीस अधिनीयमचे कलम १३५ नुसार उदगीर शहर पोलीस ठाण्यात 16 नोव्हेंबर रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांच्या आदेशाने पोलीस हेडकॉन्स्टेबल पवण गायकवाड़ हे करीत आहेत.50 वर्षांपासून चालत आलेल्या रेड्याच्या झुंजीवर पहिल्यांदाच उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रेड्याच्या झुंजी लावणे हे आयोजकांच्या चांगलेच अंगलट आले आहे.
0 Comments