*क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचा दौरा*
लातूर: राज्याच्या क्रीडा व युवक कल्याण, बंदरे विभागाचे मंत्री संजय बनसोडे हे शनिवार, 2 डिसेंबर 2023 रोजी लातूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
ना. बनसोडे हे 2 नोव्हेंबर सकाळी 8.30 वाजता शकुंतला निवासस्थान येथून हरंगुळ बु. कडे प्रयाण करतील. सकाळी 9 वाजता हरंगुळ बु. येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती, महाराष्ट्र प्रांत संचलित संवेदना दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या उद्घाटन समारंभास ते उपस्थित राहतील. दुपारी 12.30 वाजता लातूर येथून मोटारीने उदगीरकडे प्रयाण करतील.
क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. बनसोडे हे दुपारी 1.30 वाजता उदगीर शहरातील देगलुर-निडेबन रोडवरील दत्ता खंकरे यांच्या नुतन वास्तुच्या गृहप्रवेश कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी 3 वाजता जळकोट तालुक्यातील वांजरवाडा येथे वै. सदगुरु श्रीगुंडामहाराज (३ रे) देगलूरकर पुण्यस्मरण आणि वै. गुरुवर्य शंकरमहाराज खंदारकर जन्मशताब्दी महोत्सवास उपस्थित राहतील. दुपारी 4 वाजता वांजरवाडा येथून मोटारीने नांदेड जिल्ह्यातील उमरदरी-मुखेडकडे प्रयाण करतील. नांदेड जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहून रात्री 8.30 वाजता त्यांचे लातूर येथे आगमन होईल. रात्री 10.30 वाजता ते मुंबईकडे प्रयाण करतील.
0 Comments