ग्रामीण पोलिसांचे तालुक्यात विविध ठिकाणी अवैध गावठी हातभट्टी दारू विक्री करणाऱ्या अड्ड्यावर छापे
उदगीर:तालुक्यात अवैध गावठी दारू विक्री करणाऱ्या अड्ड्यावर ग्रामीण पोलिसांनी छापे टाकून दमदार कारवाई करून चार गुन्हे नोंदवले आहेत.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की उदगीर तालुक्यातील अवलकोंडा परिसर व नागलगाव परिसरात मोठया प्रमाणावर गावठी हातभट्टी दारूची विनापरवाना चोरटी विक्री होत असल्याची माहिती उदगीर ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप पांडुरंग भागवत व ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या सूचनेनुसार ग्रामीण पोलिसांच्या पथकाने अवलकोंडा परिसरात व नागलगाव परिसरात अवैध गावठी हातभट्टीची विनापरवाना चोरटी विक्री करणाऱ्या अड्ड्यावर छापे टाकून 22 लिटर हातभट्टी गावठी दारू 100 रुपये लिटर प्रमाणे ज्यांची किंमत 22 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल उदगीर ग्रामीण पोलिसांनी जप्त करून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात चौघांवर कलम 65 (ड) ई महाराष्ट्र दारूबंदी कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.ही कारवाई ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक आनंद नामदेवराव श्रीमंगल,नामदेव व्यंकटराव धूळशेट्टे,गजानन नरसिंग जगताप,यांनी केली या कारवाईमुळे ग्रामीण भागात अवैध हातभट्टी दारू विक्री करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत.पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल धुळशेट्टे हे करीत आहेत.
0 Comments