परळी रेल्वे पार्सल कार्यालयाच्या हलगर्जीपणामुळे उदगीर रेल्वे स्थानकावर एक मिनिट थांबणाऱ्या रेल्वेला 53 मिनिटे थांबावे लागले,प्रवाशांचे हाल
उदगीर:साईनगर शिर्डी काकीनाडा एक्सप्रेस ट्रेन क्रमांक 17205 या रेल्वेत टिनोपाल देविदास बागुल राहणार नाशिक यांनी त्यांची दुचाकी मनमाड रेल्वे स्टेशन येथे पार्सल कार्यालय मधून रेल्वे गाडीत चढवली सदरील मोटारसायकल परळी वैजनाथ येथे उतरविण्याची पोच प्रवाशांकडे असताना परळी वैजनाथ येथील रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणा व हलगर्जीपणामुळे दुचाकी उतरून घेतली नाही.मोटरसायकल पुढे जात असल्याचे टिनोपाल देविदास बागुल या प्रवाशांच्या लक्षात आल्याने आपली मोटरसायकल पुढे जात आहे आपल्याला मोटारसायकल मिळते की नाही अशी भीती त्या प्रवाशांच्या मनामध्ये निर्माण झाली.साईनगर शिर्डी काकीनाडा एक्सप्रेस रेल्वे 1 डिसेंबर रोजी पहाटे 4:15 वाजता उदगीर रेल्वे स्थानकावर आली असता टिनोपाल देविदास बागुल या प्रवाशांने आपली गाडी मिळवण्याच्या प्रयत्नात रेल्वे गाडी पुढे जाऊ नये म्हणून दोन ते तीन वेळा गाडीची चैन ओढून सदर गाडीच्या पायलटला गाडी पुढे नेण्यास मनाई केली.पायलट यांनी उदगीर रेल्वे स्टेशन मास्तर यांना संपर्क साधून 53 मिनिटे गाडीला उशिरा झाल्याने संबंधीतावर कार्यवाही करण्यासंदर्भात लेखी मेमो दिला.सदरील घटनेची माहिती परळी वैजनाथ रेल्वे पोलिसांना देण्यात आली मात्र उदगीर रेल्वे स्थानकावर 53 मिनिटे रेल्वे थांवल्याने प्रवाशांना ताटकळत बसावे लागले.सदरील प्रवाशी टिनोपाल देविदास बागुल यांची मोटरसायकल उदगीर रेल्वे स्टेशन येथे पोलीस कर्मचाऱ्यांनी पार्सल कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने उतरवून घेण्यात आले.उदगीर रेल्वे स्टेशन येथे आरपीएफचे अधिकारी नेमणुकीस नसल्यामुळे नेहमी वारंवार अशे प्रकार घडत आहेत.असे प्रकार घडत असतील तर प्रवाशांच्या सुखसुविधेचा निर्माण झाला आहे.रात्री झालेल्या घटनेमुळे उदगीर रेल्वे स्टेशन येथे प्रशासनाने आरपीएफ कर्मचाऱ्यांची नेमणूक करेल का हे पहावे लागणार आहे.परळी वैजनाथ रेल्वे पोलीस प्रशासनाच्या बेजबाबदार व हलगर्जीपणामुळे उदगीर रेल्वे स्थानकावर 53 मिनिटे रेल्वे थांबल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.टिनोपाल देविदास बागुल यांनी मात्र जो कोणी रेल्वे पोलीस अथवा रेल्वे सुरक्षा बल कर्मचारी मोटरसायकल उतरविण्यास दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.रेल्वे स्टेशन परळी येथे रेल्वे थांबली असता टिनोपाल देविदास बागुल यांनी पार्सल कार्यालयात गेले होते मात्र तेथे कर्मचारी नसल्याने त्यांनी रेल्वे सुरक्षा बल कार्यालयात गेले तेथेही कर्मचारी उपस्थित नव्हते,ही सगळी धावपळ करीत असताना रेल्वे सुटण्याची वेळ झाली आणि रेल्वे पुढे निघाली रेल्वे लातूर रोड स्थानकवर अली तेथेही दुचाकी उतरून घेण्यासाठी प्रयत्न केला परंतु उपयोग झाला नाही, गाडी तेथून पुढे निघाली व उदगीर रेल्वे स्थानकावर येऊन थांबताच गाडीची चैन ओढून गाडी थांबवली,जवळपास तासभर गाडी उदगीर रेल्वे स्थानकावर उभी राहिली एका पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने प्रवाशांची दुचाकी उतरूवून पार्सल कार्यालयात ठेवण्यात आल्याची माहिती प्रवाशी टिनोपाल देविदास बागुल यांनी बोलताना दिली.तर उदगीर रेल्वे पार्सल विभागाचे राजेंद्र शेषराव यांच्याशी बातचीत केली असता ज्या ठिकाणी रेल्वेला पाच मिनिटे थांबा असेल तर त्या ठिकाणी पार्सल सुविधा उतरूनवून घेण्याचा व चढवण्याचा नियम आहे परंतु सदरील प्रवाशी यांनी उदगीर रेल्वे स्थानकावर एक मिनिट थांबा असणाऱ्या रेल्वेला तासभर अडवून धरले त्यामुळे आम्हाला सिकंदराबाद येथे वरिष्ठांना आठ ते नऊ वेळेस फोन करून सदरील घटनेची माहिती द्यावी लागली. प्रवाशांनी केलेल्या हुल्लडबाजीमुळे रेल्वेतील प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. रेल्वे एक तास थांबवने हे कायद्यानुसार गुन्हा होऊ शकतो पुढील कार्यवाही रेल्वे पोलीस करतील असेही ते बोलताना सांगितले.
0 Comments