Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

कै.गजानन भुसारे पत्रकारिता पुरस्काराने राम मोतीपवळे सन्मानित

कै.गजानन भुसारे पत्रकारिता पुरस्काराने राम मोतीपवळे सन्मानित

उदगीर; येथील दैनिक यशवंत चे विभागीय प्रतिनिधी राम मोतीपवळे यांना कै. गजानन भुसारे स्मृति पत्रकारिता पुरस्कार 2023 आज येरोळ येथे जिल्हा परिषद प्रशालेत झालेल्या कार्यक्रमात माजी खा. डॉ. सुनील गायकवाड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. स्मृतीचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप आहे .
यावेळी माजी खासदार श्री सुनील गायकवाड म्हणाले दिवंगत पञकार गजानंद भुसारे यांच्याकडून पञकार क्षेत्रात दोन तालुक्यात मोलाची कामगिरी झाली आहे शिरूर अनंतपाळ तालुक्यातील ते पहिले पञकार त्यामुळे भाजपच्या काळात 1995 मध्ये तालुका झाला तेथील अनेक सुविधा अभाव ते सतत जनसामान्यांच्या अडचणी दै सकाळ माध्यमातून मांडायचे ते नंतर नौकरी निमित्त अहमदपूर येथे रुजू झाले तेथून त्यांनी पुण्यनगरीत काम करत आपल्या निर्भिड लिखाणातून लोकांना शासन दरबारी न्याय मिळवून देण्यासाठी मोलाची कामगिरी केले त्यांची आठवण समाज नक्की ठेवेल मी एक पञकारच आहे त्यामुळे पञकार दुसऱ्या पञकाराचे मोल चांगले ओळखू शकतो, पुरस्कार विजेते राम मोतीपवळे हेही दै यशवंत मधून गेली चाळीस वर्षापासून उदगीर व परिसरातील लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मोठे काम करीत आहेत आशा दोन्ही महाण पञकाराच्या कार्यक्रमाला मला उपस्थित रहाता आले हे मी माझे भाग्य समजतो
यावेळी मंचावर उपशिक्षणाधिकारी प्राथमिक लातूर प्रमोद पवार, उपसरपंच सतिश सिंदाळकर,पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल दराडे, लोकाधिकार संघाचे संपादक व्यंकट पन्हाळे ,कृषी अधिकारी लक्ष्मण खताळ ,महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे अधिकारी लक्ष्मीकांत जोंधळे, ॲड.शैलेश गोजमगुंडे, लिंगायत महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. सुदर्शन बिरादार, कवी भारत सातपुते, शिरूर  अनंतपाळ गटशिक्षणाधिकारी अनुपमा भंडारी, दैनिक सकाळचे शिरूर अनंतपाळ बातमीदार शिवानंद भुसारे , गटविकास अधिकारी बळीराम चव्हाण,कवि अनंतराव कदम, संरपच सुकुमार लोकरे, केंद्र प्रमुख ईश्वर बिरादार, तानाजी महाराज दाडगे,अमर पाटील, मुख्याध्यापक डी एन निचळे, शिक्षक टी डी बिरादार, कृषी सहायक ओम अंधारे,एम ओ मोदी, डॉ वैष्णवी भुसारे, गौरव भुसारे यांची उपस्थिती होती. सत्काराला उत्तर देताना राम मोतीपवळे म्हणाले आपल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन पञकार क्षेत्रातील भुषण दिवंगत पञकार गजानंद भुसारे यांच्या स्मरणार्थ हा जो पुरस्कार भुसारे परिवार व येरोळकरांनी मला दिला हे माझ्यासाठी मोठा सन्मानच आहे, त्याबद्दल संयोजकांचे आभार व्यक्त करून आपल्या हातून आणखी चांगले काम होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. सूत्रसंचालन सतीश हाणेगावे यांनी केले
    यावेळी गुडाप्पा सुगावे यांनी उपस्थितीतांचे आभार मानले

Post a Comment

0 Comments

जाहिरात