उदगिरात सप्ताह कार्यक्रमात चाकुने वार; एकाविरुद्ध गुन्हा..
उदगीर शहरातील हनूमान नगर सिग्नल नं. २ मध्ये सुरू असलेल्या सप्ताह कार्यक्रमात गोंधळ घालणाऱ्यास रोखल्याने त्या व्यक्तीने रोखणाऱ्यावरच चाकूने वार करून जखमी केले. याप्रकरणी बुधवारी (१३ डिसेंबर) उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात एकाविरुद गुन्हा दाखल झाला आहे.
शहरातील हनूमान नगर भागात दि.८ डिसेंबर रोजी रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास सुरू असलेल्या सप्ताह कार्यक्रमात महादेव व्यंकटराव टवटेवाडे (रा. हनूमान नगर उदगीर) हा सप्ताह कायक्रमात गोंधळ घालत असताना फिर्यादी हा त्यास तूम्ही इथे गोंधळ करू नका येथून निघून जा असे म्हणाले असता त्यांने शिवीगाळ करीत त्याच्या हातातिल चाकू ने फिर्यादीच्या छातीचे मदोमद उजव्या बाजूला मारून जखमी केले. व जिवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी श्याम सुरेश पिंपरे (रा. हनुमान नगर उदगीर) यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात महादेव व्यंकटराव टवटेवाडे (रा. हनूमान नगर उदगीर) गुन्हा नोंद करण्यात आला आहे.अधिक तपास ग्रामीणचे पोलीस करीत आहेत
0 Comments