अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वंयसहाय्यता बचत गटांनी मिळणार मिनी ट्रॅक्टर व उपसाधने
*लातूर दि. 12 सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 8 मार्च, 2017 रोजीच्या शासन निर्णयानुसार अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्यात येतो. 2023-2024 वर्षामध्ये या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक पात्र बचत गटांनी 31 डिसेंबर 2023 पर्यंत आपले अर्ज समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांच्या कार्यालयात सादर करावेत, आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त एस. एन. चिकुर्ते यांनी केले आहे.
या योजनेच्या मार्गदर्शक सूचना 8 मार्च 2017 रोजीच्या शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आल्या आहेत. हा शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर निरीक्षणासाठी उपलब्ध आहे. तरी जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांनी या योजनेसाठी अर्ज करावेत, असे आवाहन श्री. चिकुर्ते यांनी केले आहे.
****
0 Comments