पत्रकार संग्राम पवार यांना चांगल्या कामाची पावती मिळाली,महिला आघाडीच्या प्रमुख ज्योती ऐकूर्केकर
उदगीर:साप्ताहिक विक्रांत पेपरचे मुख्य संपादक,एन.एम.न्युजचे लातूर जिल्हा प्रतिनिधी, उदगीर व देवणी तालुक्याचे पब्लिक एपचे तालुका प्रतिनिधी, जयसेवा युट्यूब चॅनलचे संपादक श्री.संग्राम पवार यांना राज्यस्तरीय पत्रकार प्रेरणा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल बहुजन विकास अभियानाच्या महिला आघाडी प्रमुख ज्योतीताई संजयकुमार ऐकूर्केकर यांनी अभिनंदन केले. ज्योतीताई ऐकूर्केकर बोलताना म्हणाल्या की. पत्रकार संग्राम पवार यांनी उदगीर तालुक्यात आपल्या लेखणीतून निस्वार्थपणे कोणालाही पाठीशी न घालता लिखाण करून बातम्या छापण्याच उत्कृष्ट काम त्यांनी केले. उदगीर तालुक्यातील नागलगाव मारोती तांडा या लहानश्या बंजारा तांड्याचे रहिवासी असलेले पत्रकार संग्राम पवार यांनी त्यांच्या पत्रकारितेच्या कारकिर्दीत निर्भीडपणे पत्रकारिता जोपासली त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला.चांगल्या कामाची पावती कधी ना कधी नक्की मिळते,देर है लेकीने अंधेर नहीं,हे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याने सिध्द झाले आहे असे त्या बोलताना म्हणाल्या,पत्रकार संग्राम पवार यांचा बहुजन विकास अभियानाने आयोजित केलेल्या सत्कारावेळी ते बोलत होत्या.यावेळी बहुजन विकास अभियान प्रमुख संजयकुमार कांबळे,संजय नामदेव राठोड,मानसिंग पवार,लक्ष्मण आडे, रवी डोंगरे,विदेश नारायण पाटील, अलुरे मामा,संजय उजेडकर,आदी बहुजन विकास अभियानाचे पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments