उदगिरात खादी ग्रामोद्योग केंद्रात ७० वर्षापासून सुरू आहे कापडाचे विनकाम..
उदगीर शहरात स्वातंत्र्य पुर्वी विनकर समाजाच्या वतीने घरोघरी खादीचे सुत विनण्याचे काम व्हायचे. मात्र १९६२ मध्ये मराठवाडा खादी ग्रामोद्योग समिती नांदेड अंतर्गत उदगीर शाखे अंतर्गत राष्ट्रध्वजसाठी लागणारे खादीच्या कापडाची विनाईचे काम सुरू झाले. या भागातील महिला स्वालंबी व्हावे या उद्देशाने स्वामी रामानंद तिर्थ यांच्या प्रयत्नातून १९६७ मध्ये मराठवाडा खादी ग्रामोद्योग समिती नांदेड अंतर्गत उदगीर खादी ग्रामोद्योग शाखेची रजि.नं.एफ १२७ आधारे स्थापना झाली. व मोठ्या प्रमाणावर काम सुरू झाले. त्यानंतर स्वामी रामानंद तिर्थ यांच्या नंतर थोर स्वातंत्र्य सेनानी गोविंद भाई श्राफ यांनी य संस्थेची बागडोर हातात घेतली. हे कार्य अखंड चालू ठेवले. व उदगीर खादी ग्रामोद्योग कार्यालयात राष्ट्रध्वजासाठी लागणारे खादी कापड विनन्याचे काम आजतागायत सुरू आहे.
अल्पदरात ५० ते ६० महिला कामगार
उदगीर खादी ग्रामोद्योग येथे काम करणारे कामगार हे अंग मेहनतीवर अल्पशा मजुरीवर विधायक कार्य म्हणून महिला कामगार काम करीत आहेत. ध्वजासाठी लागणारे कापड विनण्याकामी प्रति मिटर विनणे काम २१ रुपये मिळतात तर पेळू कोणीपासून हजार मिटर दोरा तयार करण्यासाठी प्रति हजार मिटर २१ रुपये मजूरी दिली जाते. येथे काम करणारे महिला मागील ४० ते ५० वर्षापासून काम करीत आहेत. त्यांची दिवसाकाठी २०० रुपये पर्यंत मजूरी मिळत आहे.
उदगीर, नांदेड आणि आंध्रात होते ध्वजाचे संपूर्ण काम...
ध्वजाचे कापड तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल तथा पेळू कोणी हे कर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग येथून उदगीरला येतो त्यापासू सुत कताई, सोलार कताई आणि ध्वज कापड विनाई हे तीन कामे उदगीर येथे करुन शुध्द खादीचे कापड तयार होऊन नांदेड येथे पाठवले जाते. व त्यानंतर त्या कापडावर आंध्र प्रदेशात कलर आणि धुलाई केली जाते. व त्यानंतर नांदेड येथे अशोक चक्र व शिलाई होऊन काऊंटर बेसपर्यंत पोहचविला जातो.
तुटपुंज्या मानधनावर १३ कर्मचारी तथा कामगार कार्यकर्ते करतात काम..
उदगीर शाखेत संभाजी बिरादार, सचिन हैबतपूरे, शकुंतला सोळंके, बिलाल शेख यांच्यासह एकुण १३ कामगार कार्यकर्ते प्रतिमहा १० ते १२ हजार मानधनावर काम करीत आहेत.
उदगीर खादी ग्रामोद्योग शाखेची इमारत मोडकळीला...
राज्यासह संपूर्ण देशाला तिरंगा ध्वजासाठी लागणारा कापड तयार करून देणाऱ्या उदगीर खादी ग्रामोद्योग शाखेची अडीच एक्करवर असलेली इमारत मोडकळीला आली आहे. तर निधी अभावी अनेक कामे प्रलंबित आहेत. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सर्व सोयीसुविधा उपलब्ध असून येथील मशिनरी विद्दूत विरहित आहेत.
अकबर अहमद शेख
व्यवस्थापक
खादी ग्रामोद्योग शाखा उदगीर
0 Comments