उदगीर नांदेड रोड अशोका पॅलेस हॉटेल जवळ दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक एक जण ठार तर पोलीस कर्मचारी गंभीर जखमी
उदगीर:नांदेड रोडवर अशोका पॅलेस हॉटेल जवळ दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक झाल्याने एक जण ठार तर एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची घटना २५ जानेवारी रोज गुरुवारी सांयकाळी ६ वाजेच्या दरम्यान घडली आहे. सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी नांदेड उदगीर रोडवर दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन एक जण ठार झाला आहे तर एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात रवी गोटाळवाड वय 30 वर्ष व्यवसाय वायरम राहणार हंडरगुळी ता उदगीर हे जागीच ठार झाले तर उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे पोलीस कॉन्स्टेबल पदावर असलेले परमेश्वर वागदकर गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.पोलीस कर्मचारी वागदकर यांच्यावर उदयगिरी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
0 Comments