चोंडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा
उदगीर तालुक्यातील चोंडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक श्री राजकुमार मोरखंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शालेय विद्यार्थ्यांची गावातून प्रभातफेरी काढण्यात आली, प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेत विद्यार्थ्यानी भाषणे सादर केली,प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेत घेण्यात आलेल्या शालेय स्पर्धेचे बक्षीस वितरण शाळेचे मुख्याध्यापक राजकुमार मोरखंडे यांच्या हस्ते देण्यात आले,यावेळी शाळेतील सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments