उदगीर किल्यावर प्रजासत्ताकदिनी ध्वजवंदन
उदगीर;२६ जानेवारी २०२४ वर्ष ' हिंदवी स्वराज्या ' चं ३५० वर्ष अनोख्या व अभिनव उपक्रमांनी आणि उत्साहवर्धक 'शिवप्रतिज्ञा ' नी मोठ्या उत्साहात पार पडला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाला ३५० वर्ष पुर्ण होत असल्याने यानिमित्ताने २६ जानेवारी २०२४ रोजी प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्रातील ३५० गड-किल्ले गडकोटावर व मराठवाडयातील सर्व किल्यांवर भारतीय राष्ट्रध्वज व स्वराज्याचा केसरी जरी पटका ध्वज फडकवण्याचा राष्ट्रीय कीर्तीमान प्राप्त गिर्यारोहक तथा अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष उमेश झिरपे, इतिहास अभ्यासक, शासन गड संवर्धन समिती सदस्य, लेखक, पत्रकार संकेत कुलकर्णी, कार्यवाह डॉ.राहुल वारंगे, गिर्यारोहक महासंघ पदाधिकारी श्रीमती दीपाली भोसले, एव्हरेस्टवीर रफीक शेख व महासंघाच्या संकल्पा उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील व मराठवाडयातील दुर्गाप्रेमी, शिवप्रेमी व्यक्ती व संस्था महाराष्ट्रातील ३५० किल्यांवर शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून तिरंगा व भगवा ध्वज फडकविण्याचा ठाम विश्वास व निर्णयानुसार उदगीरच्या भोईकोट किल्यावर ध्वजवंदन करून शिवछत्रपतींना अभिवादन करण्यात आले.
यावेळी वंदन मातृभूमी प्रतिष्ठान परिवाराने आज दि.२६ जानेवारी २०२४ शुक्रवार रोजी उदगीर किल्ला येथे अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ व वंदन मातृभूमी प्रतिष्ठान परिवार यांच्यातर्फे उदयगिरी महाराज मंदिर परिसरामध्ये शिवप्रेमींनी भगवा ध्वज व तिरंगा शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा व भारत मातेच्या प्रतिमेचे माजी सैनिक संदीप रोडगे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. याप्रसंगी भारतीय प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय समारोह नियमाप्रमाणे तालुकादंडाधिकारी तथा तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्या हस्ते उदगीर किल्ल्यावर तिरंगा ध्वजारोहण झाला. याप्रसंगी माजी सैनिक संदीप रोडगे यांनी तहसीलदार रामेश्वर गोरे यांना अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ आणि वंदन मातृभूमी प्रतिष्ठान परिवारांच्या वतीने २६ जानेवारी या दिवशीच्या कार्यक्रमाची माहिती व कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. यावेळी ऋषीकेश चौसष्टे, गणेश स्वामी, सागर रोडगे, स्वप्निल ममदापुरे, गोविंद रंगवाळ, पत्रकार संजय शिंदे, दलितमित्र बालासाहेब शिंदे अतनूरकर, सामाजिक कार्यकर्ते बी.जी.शिंदे उपस्थित होते. यावेळी शिव-प्रतिज्ञा घेण्यात आली.
0 Comments