Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांना दिला निरोप,नांदेड येथे बदली.अनुभव सांगताना झाले भावुक

पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांना दिला निरोप,नांदेड येथे बदली.अनुभव सांगताना झाले भावुक

उदगीर:शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांची नुकतीच नांदेड जिल्ह्यात बदली झाली,पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांना पोलीस प्रशासनाच्या वतीने सपत्नीक सत्कार करून निरोप देण्यात आला. पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी दोन फेब्रुवारी २०२३ रोजी उदगीर शहर पोलीस स्टेशन येथे रुजू झाले होते, उदगीर शहर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्या नंतर त्यांनी उदगीर शहरातील रहदारीस होणारा अडथळा दूर केला, रस्त्यावर अतिक्रमण करून अडथळे निर्माण करणाऱ्यावर कारवाई केली,शहरात फटाके फोडणाऱ्या बुलेट गाड्यावर कारवाई केली,ऑटो चालकांना ड्रेस कोडचे नियम लावून ऑटो चालकात शिस्त लावली,पोलीस निरीक्षक कदम यांनी कधीही आपल्या कर्तव्यात कसूर केली नाही.रात्रंदिवस रस्त्यावर उतरून सतत काम करणारे पोलीस निरीक्षक म्हणून त्यांनी एक वर्षात तालुक्यात ओळख निर्माण केली,त्यांच्या कार्यकाळात वाहनांवर केलेल्या कारवाईतून पावणे दोन कोटींचा दंड वसूल करण्यात आला.उदगीर शहराला शिस्त लावण्यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केला,त्यांच्या प्रयत्नाला यश मिळत गेले.पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी उदगीर शहरात केलेले काम व आलेला अनुभव व लोकांनी केलेले सहकार्य याचा अनुभव सांगताना ते भावुक झाले.उदगीर शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक तपशाळे, पोलीस उपनिरीक्षक कविता जाधव यांच्या जिल्ह्या अंतर्गत बदली झाल्याने त्यांनाही निरोप देण्यात आला.यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप भागवत, ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार,ऑड गुलाब पटवारी,माजी सभापती प्रा.शिवाजी मुळे, माजी उपसभापती रामराव मामा बिरादार,प्रा.झुंगा स्वामी,अहमद सरवर,माजी नगरसेवक फयाज शेख,उदगीर शहरातील पत्रकार बांधव व विविध संघटनेचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.सर्व उपस्थितांनी परमेश्वर कदम यांचा सत्कार करून निरोप दिला.व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments

जाहिरात