*देवणीत साई प्रतिष्ठानच्या वतीने कला ,क्रीडा फेस्टिव्हल महोत्सवाचे आयोजन
*देवणी* : प्रति वर्षीप्रमाणे सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या देवणी येथील साई प्रतिष्ठाणच्या वतीने दि 28 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी ठीक 7 वाजता शहरांच्या मध्यभागी असलेल्या माणिकराव पाटील यांच्या मैदानावर सुप्रसिद्ध समाज प्रबोधनकार प्रा डॉ श्री वसंत हंकारे सर यांचे अभ्यास पूर्ण धडाकेबाज व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे तसेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी शिफा पुणेकर व प्राजक्ता पुणेकर यांचा तुझ्यात जीव रंगला अश्या बहारदार लावणीचा कार्यक्रम होणार आहे तसेच यावेळी देवणी तालुक्यातील विविध क्षेत्रात उत्कृट काम करणाऱ्याना कर्तबगार व्यक्तीना समाजभूषण पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे या व्याख्यान व लावणी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन देवणी कला क्रीडा महोत्सवाचे संस्थापकध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी , रमेश कोतवाल, फकीर बुद्रे, रेवन मळभागे,डॉ संजय घोरपडे, सतीश बिरादार, दत्ता पाटील तळेगांवकर, संयोजक बबन कांबळे,व निमंत्रक डॉ सौ कीर्तीताई घोरपडे, नगराध्यक्षा नगर पंचायत देवणी उपनगराध्यक्ष अमित मानकरी प्रवीण बेळे यांनी केले आहे देवणी शहरासह तालुक्यातील प्रत्येक क्षेत्रातील मान्यवर लोकांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हान करण्यात आले आहे.
0 Comments