दावनगाव येथे २४ फेब्रुवारी राजी मराठा समाजाचा रास्ता रोको आंदोलन
उदगीर:तालुक्यातील दावनगाव येथे २४ फेब्रुवारी रोज शनिवारी दुपारी ११ वाजता मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन उपजिल्हाधिकारी,तहसीलदार,उपविभागीय पोलीस अधिकारी,व ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांना २३ फेब्रुवारी रोज शुक्रवारी देण्यात आले, मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण द्यावे या मागणिकरिता रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे, यावेळी शिवाजी तुकाराम भोळे धनाजी शेषराव मुळे, राजकुमार बाबुराव भांडे, सोपान नरसिंग महापुरे, बालाजी जीवनराव हुरुसनाळे,आशिष धनाजीराव हुरुसनाळे आदी मराठा बांधव उपस्थित होते,
0 Comments