पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी: उदगीर येथे भाजप कार्यकर्त्यांनी केले आंदोलन
उदगीर : पश्चिम बंगाल राज्यात महिलांची सुरक्षितता धोक्यात आली असून महिलांवर अत्याचार करणारे आरोपी मोकाट फिरत आहेत. महिला मुख्यमंत्री असून सुद्धा त्या राज्यात होणारे महिलांवरील अत्याचार कमी होत नाहीत. याचा निषेध करीत उदगीर येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शहराध्यक्ष मनोज पुदाले यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन केले. पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणीही यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली.
या आंदोलनात शहराध्यक्ष मनोज पुदाले, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा उत्तरा कलबुर्गे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अमोल निडवदे, तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटोदे, माजी नगरसेवक रामचंद्र मुक्कावार, ऍड. दत्ताजी पाटील, ज्येष्ठ नेते धर्मपाल नादरगे, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष उषा माने, शहराध्यक्षा शिल्पा इंगळे, रामेश्वर पवार, आनंद बुंदे, युवा मोर्चा शहरध्यक्ष रामेश्वर चांडेश्वरे, आनंद साबने, प्रसाद नाईकवाडे, संजय पांढरे, अनिता बिरादार, मंदाकिनी जीवने, स्वाती वट्टमवार, रमाबाई वाघमारे, दीपा कोंगे, रंजना भिंगे,रेणुका डुबुकवाड, कृपा सूर्यवंशी, वर्षाताई धावारे, शिवगंगा बिरादार, प्रीतम वीरशैटे, रामेश्वर कोटलवार, प्रथम सदानंदे, मंगेश येरकुंटे, प्रसाद पांढरे, ओम काबरा यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments