*राष्ट्रीय पेयजल सर्वेक्षणात उदगीर नगरपरिषदेला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर*
लातूर, दि. 2 : केंद्र शासनामार्फत उदगीर शहर पाणी पुरवठा प्रकल्पाची व शहरातील पाणी वितरणाची गतवर्षी दोन वेळा राष्ट्रीय पेयजल पथकाद्वारे तपासणी करण्यात आली. या सर्वेक्षणात कामाच्या गुणवत्तेबाबत उदगीर नगरपरिषदेची पुरस्कार प्राप्त शहरामध्ये निवड झालेली आहे. त्यानुसार उदगीर नगरपरिषदेस ५ मार्च, २०२४ रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे राष्ट्रीय पुरस्कार देवून गोरविण्यात येणार आहे. क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे आणि जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी याबद्दल उदगीर नगरपरिषदेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
उदगीर पाणी वितरण व्यवस्थापन, तीन जलशुध्दीकरण केंद्र, शहरातील पाणी वितरण व्यवस्थेवरील नळजोडणी, गळती, पिण्याचा पाण्याची टाकी, विद्युत विंधन विहीरी व हातपंप इत्यादी कामाची राष्ट्रीय पेयजल सर्वेक्षण अंतर्गत गुणवत्तेबाबत तपासणी करण्यात आली. त्यानुसार राष्ट्रीय पुरस्कारासाठी उदगीर नगरपरिषदेची निवड झाली आहे.
नगरपरिषदेचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तत्कालीन मुख्याधिकरी शुभम क्यातमवार, विद्यमान मुख्याधिकारी सुंदर बोंदर, नगरपरिषदेचे पाणी पुरवठा अभियंता सुनिल एस. कटके यांच्या नेतृत्वातील टीमने राष्ट्रीय पेयजल सर्वेक्षणात उल्लेखणीय काम केले.
****
0 Comments