Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

शेकापूर शिवारातील बैलजोडी पळवली; अज्ञाताविरुध्द चोरीचा गुन्हा..

शेकापूर शिवारातील बैलजोडी पळवली; अज्ञाताविरुध्द चोरीचा गुन्हा..

उदगीर : प्रतिनिधी
 उदगीर तालुक्यातील शेकापूर शेत शिवारातील आखाड्यावर बांधलेली १ लाख १० हजार रुपयांची बैलजोडी चोरून घेऊन गेले. ही घटना शनिवारी (२ मार्च) उघडकीस आली. याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि.१ मार्चच्या रात्री पासून ते २ मार्चच्या सकाळी साडेआठ दरम्यान शेकापूर शिवारातील फिर्यादीच्या आखाड्यावर १ लाख १० हजार रुपयांची बांधलेली बैलजोडी कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन घेऊन गेले आहे.
याप्रकरणी ज्ञानोबा भानुदास कोनाळे (रा. शेकापुर ता. उदगीर) उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुध्द चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हेडकाँस्टेबल डी.बी.पडीले हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

जाहिरात