Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

उदगिरात मतदान केंद्रावर नियुक्त कर्मचाऱ्यांचे प्रथम व द्वितीय प्रशिक्षण; सत्रात १०९ कर्मचाऱ्यांनी मारली दांडी..

उदगिरात मतदान केंद्रावर नियुक्त कर्मचाऱ्यांचे प्रथम व द्वितीय प्रशिक्षण; सत्रात १०९ कर्मचाऱ्यांनी मारली दांडी..

 प्रतिनिधी/संदेश कांबळे
उदगीर येथील नळेगाव रोडवरील पोस्ते पोतदार लर्न स्कुल येथे रविवारी (७ एप्रिल) आयोजित मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेल्या उदगीर विधानसभा क्षेत्रातील अधिकारी,कर्मचारी यांचे प्रथम प्रशिक्षण कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात एकुण १ हजार १३० पैकी १ हजार ७० कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण घेतले तर ६० कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणाला दांडी मारली.तर दुसऱ्या प्रशिक्षण सत्रात ११२२ पैकी १०६३ कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले तर ५९ कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणास दांडी मारली,दोन्ही सत्रात एकूण १०९ कर्मचाऱ्यांनी दांडी मारली आहे.

     यावेळी उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार उदगीर राम बोरगावकर, जळकोट तहसीलदार सुरेखा स्वामी, नायब तहसीलदार ज्ञानोबा मोरे, यांच्यासह आदींची उपस्थिती होते.
उदगीर विधानसभा मतदारसंघ क्र. २३७ च्या लोकसभा निवडणूक २०२४ साठी एकुण २ हजार २५२ कर्मचाऱ्यांची निवडणूक कामकाज संदर्भात नियुक्ती करण्यात आली असून प्रथम प्रशिक्षणाच्या पहिल्या सत्रात १ हजार १३० पैकी १ हजार ७० कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण घेतले तर ६० कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणाला दांडी मारली व तसेच प्रथम प्रशिक्षणाच्या दुसऱ्या सत्रात एकुण १ हजार ११२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
भारत निवडणूक आयोगाने सुस्पष्ट सूचना निर्गमित केल्या असून आपल्या जबाबदारीशी संबंधित सूचनांचे अवलोकन आणि आकलन करून घेवून प्रत्येकाने काम करावे. एखादी बाब लक्षात न आल्यास संबंधित प्रशिक्षकांना विचारून त्याचे निराकरण करून घ्यावे. कोणत्याही परिस्थितीत मतदानादिवशी चूक होवू नये, कोणतीही नोंद राहून जावू नये, तसेच मतदान यंत्र जोडणी, मॉकपोलची प्रक्रिया सुरळीत पार पडावी, याची सर्वांनी काळजी घ्यावी, अशा सूचना प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांना करण्यात आले.

Post a Comment

0 Comments

जाहिरात