Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

रिंग रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू..

 रिंग रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू..

उदगीर : प्रतिनिधी
उदगीर:शहरातील रिंग रोडवरील पांढरे मंगल कार्यालय जवळ झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराच्या डोक्यावरुन अज्ञात वाहनाचा टायर गेल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी (१५ एप्रिल) रात्री साडेआठच्या सुमारास झाला. सोमनाथ तानाजी म्हेत्रे (वय : ३० वर्षे, रा. बनशेळकी ता.उदगीर) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे.

    दुचाकी क्र.एम.एच.२४ बी.सी.४५९० या दुचाकीवरून बनशेळकी या आपल्या गावाकडे जात असताना रिंग रोडवरील पांढरे मंगल कार्यालय जवळ हा अपघात झाला. घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. उपस्थिती नागरिकांनी तात्काळ रुग्णवाहिकेला संपर्क साधून बोलावून घेतले. तोपर्यंत अपघातग्रस्त दुचाकीस्वाराच्या डोक्यातील व शरीरातील रक्तस्राव झाले होते. जखमीला उदगीर शहरातील सामान्य रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत्यू झाल्याचे घोषित केले. मयत सोमनाथ म्हेत्रे हा इलेक्ट्रीकल चे काम करीत असल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments

जाहिरात