Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

देशाच्या विकासासाठी नरेंद्र मोदींना साथ द्या : क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे*

*देशाच्या विकासासाठी नरेंद्र मोदींना साथ द्या : क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे*

*मागील १० वर्षाच्या काळात आपल्या देशाचा विकास अतिशय वेगाने झाला*

*उदगिरात महायुतीचा रेकाॅर्डब्रेक महामेळावा*

*उदगीर* : ही निवडणुक आपली नसून देशाची निवडणूक आहे. त्यासाठी सक्षम नेतृत्वाला साथ द्या, मागील १० वर्षाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला प्रगतीपथावर घेवुन जाण्याचे काम केले. सर्वसामान्य माणसांचा विकास हेच ध्येय ठेवुन त्यांनी विकासाची गती वाढवली. त्यांच्याच नेतृत्वाखाली आपले महायुतीचे उमेदवार खा. सुधाकर श्रृंगारे यांनी विविध समाज उपयोगी योजना राबवल्या शासनाच्या विविध योजना समाजघटकांपर्यंत पोहचवल्या म्हणून त्यांना पक्षाने दुस-यांदा उमेदवारी दिली असुन आपण सर्वांनी महायुतीचे घटक असलो तरी आपला महायुती हा एकच पक्ष समजून लातूर लोकसभेचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांनाच महामताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन करुन देशाच्या विकासासाठी नरेंद्र मोदींना साथ द्या असे प्रतिपादन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी केले.

ते भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,रिपाई, रासप व इतर मित्रपक्षाच्या महायुतीचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या मेळाव्याप्रसंगी बोलत होते.

यावेळी लातूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खा. सुधाकरराव शृंगारे, माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर,आ. रमेश कराड, माजी आ. गोविंद केंद्रे, माजी आ.बब्रुवान खंदाडे, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे,
डॉ. अर्चना पाटील चाकूरकर, माजी जि.प. अध्यक्ष राहुल केंद्रे, अॅड.व्यंकटराव बेद्रे, रामचंद्र तिरूके, बसवराज बागबंदे, अॅड. गुलाब पटवारी, मनोज पुदाले, विजय निटूरे, नंदकुमार नळंदवार, मनोहर भंडे,  बापूराव राठोड,भरत चामले, अनिल कांबळे, गणेश गायकवाड, उत्तरा कलबुर्गे, अमोल निडवदे, भगवान पाटील तळेगावकर, अनिल गायकवाड,  दिलीप गायकवाड, सुधीर भोसले, प्रा. पंडित सुर्यवंशी, समीर शेख, उषा रोडगे,प्रभावती कांबळे, बालाजी भोसले, सय्यद जानीमियाँ, अनिल मुदाळे, इम्तियाज शेख, बाळासाहेब मरलापल्ले, प्रीती कोळी, कल्याण जाधव,  शिल्पा इंगळे,  अमोल भालेराव, उषा माने, सोमेश्वर सोपा,  नरेश सोनवणे, अरुणा चिमेगावे, सुरेंद्र आक्कणगिरे, प्रा. श्याम डावळे,  बालाजी भोसले, समीर शेख, शिवशंकर धुप्पे, धनाजी मुळे, डॉ. प्रकाश येरमे, वसंत पाटील, संग्राम हासुळे, पाशा शेख, खाजा तांबोळी, आदीसह इतर मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना ना.बनसोडे यांनी, मागील १० वर्षाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या  नेतृत्वाखाली देशातील जनतेला सर्व सुख - सुविधा उपलब्ध करुन दिल्या. 
 यामध्ये भारताची अर्थव्यवस्था अधिक मजबुत करावयाची असल्याने नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करुन पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच करावे व आपण सर्वांनी एकमताने महायुतीचे काम करुन आपल्या उमेदवाराला अधिकचे मताधिक्य द्यावे असे आवाहन ना.बनसोडे यांनी उपस्थित कार्यकर्ते व पदाधिका-यांना केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.श्याम डावळे यांनी केले. सुत्रसंचलन प्रा.पंडित सुर्यवंशी यांनी केले तर आभार प्रा.डावळे यांनी मानले.
या महायुतीच्या मेळाव्यास बुथ प्रमुख, 
उदगीर - जळकोट तालुक्यातील
सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हा.चेअरमन, महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

जाहिरात