जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी सोमनाथपुर येथे केला बैल पोळा सण साजरा
उदगीर/प्रतिनिधी
उदगीर:तालुक्यातील सोमनाथपुर येथे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी भेट देऊन शेतकऱ्यांसोबत बैल पोळा साजरा केला,सोमनाथपुर येथील शेतकरी प्रभू पाटील यांच्या बैलाजी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी पूजा केली.यावेळी तहसीलदार राम बोरगावकर,सरपंच अंबिका पवार,ग्राम पंचायत सदस्या विमल प्रभू आडे,सुजाता
चव्हाण,जितेंद्र शिंदे,माजी सरपंच राम पाटील,माजी सरपंच किशन चव्हाण,माजी सदस्य संजय नामदेव राठोड,आदीसह गावातील शेतकरी व नागरीक उपस्थित होते,यावेळी गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांचा गावकऱ्यांच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात वाजतगाजत स्वागत करण्यात आला.
0 Comments