मल्लापूर येथे महिलेला विटाने मारहाण,दोघांवर गुन्हा दाखल
उदगीर तालुक्यातील मल्लापूर येथे एका महिलेला विटाने मारहाण करून डोके फोडल्या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांवर १३ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पोलिसांनी दिलेली माहिती अशी की १२ जून रोजी मल्लापूर येथे आरोपीने संगनमत करून फिर्यादीस तुमचे मुले अंगणातील कट्ट्याच्या अलीकडे लेकरे खेळण्यासाठी का पाठवत आहेस म्हणून फिर्यादी महिलेला शिवीगाळ करून अंगणात पडलेल्या विटाने कपाळावर मारून जखमी केले व लाथा बुक्क्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली दीपाबाई सुरेश आडे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी बजरंग दिगंबर आडे, सपना बजरंग आडे यांच्यावर गुरंन ३६३/२५ कलम ११८ (१) १५ (२) ३५२,३५१ (२) ३,(५) भारतीय न्याय संहिता २०२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांच्या आदेशाने अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल दिगंबर पडिले हे करीत आहेत.
0 Comments