उन्हाळी परीक्षा 2023 मध्ये राजीव गांधी तंत्रनिकेतन उदगीरची उज्वल यशाची परंपरा कायम
उदगीर :- जी एस पी एम द्वारा संचलित राजीव गांधी तंत्रनिकेतन उदगीरच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळा तर्फे आयोजित उन्हाळी परीक्षा 2023 मध्ये घवघवीत यश संपादन करीत तंत्रनिकेतनच्या उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे. तंत्रनिकेतन मधून सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातून तृतीय वर्षातील मानकरी कुणाल कमलाकर 82.67% , वासुदेव पियुष विजय 80.56%, वासुदेव आयुष विजय 79.22%, तसेच द्वितीय वर्षातून शेख लुकमान अब्दुल बासित 70.00% सह प्रथम, द्वितीय, तृतीय आले आहेत. मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील व्दितीय वर्षातील उळागड्डे जय विवेक 72.63 %, कांबळे शिवम राजकुमार 71.75% , बिरादार गणेश बस्वराज 70.00% सह प्रथम , द्वितीय , तृतीय आले आहेत. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागातील तृतीय वर्षातील जहागीरदार फाहद एम 85.77%, वाघ ऐश्वर्या रविकिरण 83.00%, शेख फाहाद गोहर गुलाम अस्कर 81.65%, व्दितीय वर्षातील वाघमारे सुंदरम 81.28%, किशोर मुगळे 76.40%, ऋषिकेश शेल्हाळे 76.00% तर प्रथम वर्षातील मोरगे लक्ष्मी विश्वंभर 86.88%, मुंढे अंजली चंद्रकांत 85.25%, शेख नोमान इसा 84.50% सह प्रथम, द्वितीय, तृतीय आले आहेत. इलेक्ट्रिकल इंजिनिअर विभागातून द्वितीय वर्षातील खटके शुभांगी रामभाऊ 72.67%, राठोड प्रविण रामराव 71.47% , राठोड प्रवीण विश्वनाथ 70.13% गुनासह प्रथम, द्वितीय , तृतीय आले आहेत. वरील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब राठोड, सचिव अमित राठोड, प्राचार्य जाधव पी.डी., विभाग प्रमुख मानकरी के.जी., सौ .शेख पी . के. शेख वाय. एन., इंद्राळे आर. आर. प्रथम वर्षाचे प्रवेश प्रमुख पठाण वाय. एम. सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
0 Comments