विकास नगर येथे सेवानिवृत्त ग्रामसेवकास मारहाण,ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल,
उदगीर:शहरातील विकास नगर येथे 25 जून रोजी सेवानिवृत्त ग्रामसेवकास मारहाण झाल्याची घटना घडली, पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की.फिर्यादी चंद्रकांत विश्वनाथ वलांडे यांनी त्याच्या शेजारी असलेला आरोपी दत्ता श्रीपत गठडे हा घोडा पाळतो. व तो नेहमी घरासमोर रोडवर बांधून त्या कारणावरून नेहमी तक्रार करतो,रोडवर आणून टाकलेला मुरूम होता.व नंतर त्याचे बांधकाम होवून मुरूमही काढून घेतला.दरम्यान फिर्यादीच्या शोश खड्यात पडलेला मुरूम काढल्याने तेथे पावसाचे पाणी साचू लागल्याने फिर्यादीने आरोपीस तुमच्या बाजूचे पाणी तुमच्या बाजूने जाऊद्या म्हणून सांगत असताना.आरोपीने भांडणाची कुरापत काढून चापटाने डाव्या कानावर व डोक्यात मारून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.असी फिर्याद चंद्रकांत विश्वनाथ वलांडे यांनी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिल्यावरून आरोपी दत्ता श्रीपत गठडे यांच्यावर कलम 223,504,506 भादवी प्रमाणे 29 जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे,पुढील तपास पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या आदेशाने बिट जमादार हे करीत आहेत.
0 Comments