बळीराजावरचे संकट दूर कर.नागलगाव ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी विठ्ठलाला घातले साकडे,
उदगीर तालुक्यात पावसा अभावी शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या.बळीराजावर संकट ओढावल.कर्ज काढून शेतकरी खत व बियाणे खरेदी केली.जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाच्या नजरा आभाळाकडे लागल्या,मृग नक्षत्र पूर्णपणे कोरडा गेला.आद्रता संपत आलाय तरी पाऊस झाला नसल्याने शेतकरी हतबल झाला.काही ठिकाणी अल्पभूधारक शेतकऱ्यांनी निसर्गाच्या भरवशावर कोरड्या मातीती काळ्या आईची ओटी भरण्यास सुरुवात केली आहे.पेरणीसाठी जमिनीत पुरेशी ओल नसल्याने बळीराजा दुहेरी संकटात सापडला आहे.राज्यात बळीराजावर आलेले संकट दूर कर.असे म्हणत नागलगाव ग्रामपंचायतिच्या सर्व सदस्यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विठ्ठलाला साकडे घातले.यावेळी गावचे प्रथम नागरिक सरपंच सुभाष मुन्ना राठोड, उपसरपंच नेताजी कांबळे,प्राचार्य सूर्यकांत चवळे सर,ग्रामविस्तार अधिकारी भोसले डी एन,अनिल गुरमे सर,बाबुराव बिरादार ग्रामपंचायत सदस्य साधनाताई पाटील रंजना गुंडरे,बसवराज गुडसुरे,सतीश रमेश चव्हाण,माजी सदस्य संजय भासू चव्हाण,संजय लालू चव्हाण,बंजारा समाजाचे युवा कार्यकर्ते शिवा जाधव.आदी उपस्थित होते.
0 Comments