अर्चना बार समोर १०० रूपयासाठी एका तरुणावर ब्लेडने वार,शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
उदगीर:शहरातील अर्चना बार समोर एका तरुणावर ब्लेडने वार करून जखमी केल्याची घटना घडली, पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती असी की 8 जून रोजी अर्चना बारच्या समोर पान स्टॉल जवळ आरोपीने फिर्यादीस माझे तुमच्याकडे राहिलेले 100 रुपये परत द्या म्हणून भांडण करून शिवीगाळ व धक्काबुक्की केली.व फिर्यादीच्या गळ्यावर ब्लेडने वार करून जखमी केले.असी फिर्याद आकाश बालाजी वाकुडे यांनी उदगीर शहर पोलीस ठाण्यात दिल्यावरून आरोपी संतोष शिवाजी आयनिले यांच्यावर गुरंन 173/23 कलम 324,323,504,भादवी प्रमाणे 9 जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढिल तपास पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांच्या आदेशाने पोलीस नाईक पुटेवाड हे करीत आहेत.
0 Comments