Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

दहावीच्या परिक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी-विद्यार्थिनीचा सत्कार

दहावीच्या परिक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी-विद्यार्थिनीचा सत्कार         

जळकोट:रामकृष्ण पाटील विद्यालय, सोनवळा ता. जळकोट येथील दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी-विद्यार्थिनीचा   संस्थेचे अध्यक्ष सुधाकरराव सोपनराव घोरबांड लाळीकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
रामकृष्ण पाटील विद्यालय सोनवळा या शाळेचा शंभर टक्के निकाल लागला असून आज शनिवार या दिवशी शाळेमध्ये यशस्वी विद्यार्थी, विद्यार्थिनी, विद्यार्थीला बोलावून प्रथम आलेल्या नागरगोजे पवनकुमार दगडोबा ८९.८० टक्के, द्वितीय चव्हाण स्वप्नाली शैलेश ८९.४० टक्के तसेच तृतीय पठाण आयशा युनूस ८८.४० टक्के मार्क घेऊन यश संपादन केले आहे. त्याचा संस्थेचे अध्यक्ष सुधाकर सोपानराव घोरबांड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पुढील आयुष्यत अशेच यशस्वी व्हावे अशी सदिच्छा देत मार्गदर्शन केले. तसेच शाळेतील सर्व दहावी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षकवृंद, कर्मचारी यांचे अभिनंदन केले. यावेळी संस्थेचे सचिव गिरीधर सोपानराव घोरबांड, शाळेचे मुख्याध्यापक हालकरे जी.एस., देशमुख के.जी., जागिदार एम.ई., पांचाळ एस.वाय., गायकवाड एन.एन., लिपीक सय्यद आर.बी., सेवक टाले एस.एस., उपाध्ये एन.एस., गायकवाड महेश तसेच शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी, पालक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

जाहिरात