दावनगाव नागराळ जवळ कारवर झाड कोसळले,कारचालक जखमी
उदगीर:तालुक्यातील दावणगावं ते नागराळ जाणाऱ्या रस्त्यावर १० जून रोजी रात्री कारवर झाड कोसळल्याची घटना घडली,सूत्रांनी दिलेली माहिती असी की दावणगावं व नागराळ या दोन्ही गावाच्या मध्यभागी उदगीर ते वलांडी जाणाऱ्या रस्त्यावर १० जूनच्या रात्री बाभळीचे झाड तुटून कारवरच कोसळले,कार झाडाखाली सापडल्याने कार चालक हे रात्रभर कारमध्ये अडकले होते,११ जूनच्या सकाळी घडलेली घटना येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी पाहिली.घटनेची माहिती नागराळ येथील लोकांना समजताच लोकांनी घटनास्थळी धाव घेवून एम.एच.२४ ए.एस.१४४४ या क्रमांकाच्या कार मध्ये अडकलेला कार चालक शैलेश यलमटे यांना बाहेर काढून उपचारासाठी लातूर येथे दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे कार चालकाला कंबरेत मार लागला असून वादळी वाऱ्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती ही सूत्रांनी दिली.
0 Comments