Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

अतनूरच्या श्री.काशी विश्वनाथ महादेव मंदिराची सोमवारपासून आषाढी श्रावण यात्रा ; तयारी पूर्ण.

अतनूरच्या श्री.काशी विश्वनाथ महादेव मंदिराची सोमवारपासून आषाढी श्रावण यात्रा ; तयारी पूर्ण.


अतनूर / प्रतिनिधी
संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असणाऱ्या अतनूर येथील ग्रामदैवत श्री.काशी विश्वनाथ महाराज महादेव मंदिर तथा संजीवन समाधी घेणारे श्री.घाळेप्पा स्वामी महाराजांची श्रावण महिन्यातील आषाढी श्रावण येत्या सोमवार दि.२१ आॕगस्टपासून सुरू होत असून या श्रावण यात्रेची तयारी पूर्ण झाली आहे.अशी माहिती श्री. काशी विश्वनाथ महादेव मंदिराचे संस्थापक अध्यक्ष, माजी सैनिक शिवाजी नारायणराव कदम व मार्गदर्शक माजी सभापती अशोकराव पाटील, यात्रा नियोजन समितीचे अध्यक्ष तथा तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष विकास गोविंदराव सोमुसे-पाटील यांनी दिली.
श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी श्री.काशी विश्वनाथ महादेव मंदिर व संजीवन समाधी घेणारे घाळेप्पा स्वामी महाराज यांच्या मंदिरातील शिवलिंगावर कलात्मक पद्धतीने कोरड्या तांदळाच्या पिंडी तयार केला जातात. किंवा तांदूळ शिजवून भात लेपला जातोय. या पिंडी पाहण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्राच्या, तसेच महाराष्ट्र-आंध्रप्रदेश-कर्नाटक-तेलंगना, आंध्र प्रदेश, कर्नाटका, तेलंगाना, हैदराबाद, मुंबई, पुणे, औरंगाबाद, सांगली, सातारा, कोल्हापूर, उदगीर, देवणी, जळकोट, मुखेड, नांदेड तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त दरवर्षी येत असतात. असे सांगून अध्यक्ष शिवाजी कदम म्हणाले, या श्रावण महिन्यातील आषाढी यात्रेनिमित्ताने प्रत्येक सोमवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्यामध्ये पहिला सोमवारी २१ ऑगस्टला मध्यरात्री पासूनच सकाळी पहाटेच्या मंदिरातील शिवलिंगावर महाअभिषेक, तसेच शिवलिंगावर तांदूळ शिजवून भाताचे लेप किवा कोरड्या तांदळाच्या शिवलिंगाच्या पिंड्या तयार केल्या जातात. तसेच सकाळी ८ ते ११ या वेळेत शालेय दिंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. दुसऱ्या सोमवारी २८ ऑगस्टला सकाळी पहाटेपासूनच भावी भक्तांच्या रांगा दर्शनासाठी लागतात. नित्यनेवाप्रमाणे शिवलिंगावर तांदूळ भात लेपून पद्धतीने किंवा कोरड्या तांदळाच्या पिंडी तयार केला जातात व महाआरती, महाअभिषेक केले जाते. सोमवार निमित्ताने महाप्रसाद, गावजेवण, भंडारा महाप्रसादांचे कार्यक्रम आयोजित केले जातात. या काळात निमंत्रित संगीत भजन महोत्सव ही होतात. तिसऱ्या व चौथ्या सोमवारी दुपारी एक ते पाच वाजेपर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मंगळवार दि.१२ सप्टेंबर रोजी या आषाढी श्रावण यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. यात्रेसाठी व आषाढी यात्रेनिमित्ताने श्री.काशिनाथ महाराज महादेव मंदिर व संजीवन समाधी श्री.सद्गुरु घाळेप्पा स्वामी महाराज यांचे दर्शन घेण्यासाठी अधिकअधिक भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आव्हान देखील अध्यक्ष शिवाजी कदम, मार्गदर्शक अशोकराव पाटील, यात्रा समितीचे अध्यक्ष तथा तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष विकास सोमुसे-पाटील, शासकिय ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य तथा ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याचे लातूर जिल्हा संघटक बी.जी.शिंदे अतनूरकर, किशन मुगदळे, विठ्ठल संगेवार, बाबूराव पंचगल्ले, हरिश्चंद्र कोकणे, दयानंद महाराज स्वामी, वारकरी संप्रदायाचे ह.भ.प.तथा जळकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गोविंदराव येवरे-पाटील अतनूरकर, दिलीपराव पाटील, माजी सरपंच प्रभाकरराव पाटील, संग्राम गायकवाड, नरेश कदम, ज्येष्ठ पत्रकार बालासाहेब शिंदे यांनी केले आहे. यावेळी माहिती देताना कदम म्हणाले की, वर्षभरात येथे महाराजांच्या मार्गशीष वध सप्तमीस,  पुण्यतिथी सोहळा, माघ शुध्द दशमीस समाधी सोहळा व गोकुळाष्टमीस गोपाळकाला असे मोठे तीन कार्यक्रम उर्वरित कालावधी गृहय ज्ञान सोहळा, किर्तन, प्रवचन व भजनाचे कार्यक्रम होतात. या कार्यक्रमानिमित्ताने वर्षभरात पाच ते सात लाखाच्या वरती महाराष्ट्र-आंध्रप्रदेश-कर्नाटक-तेलंगना , आंध्र प्रदेश, कर्नाटका, तेलंगणा या सीमावरती व लातूर-नांदेड जिल्हा सरहद्द वरील शेवटचे व टोकाचे पुरातन काळातील श्री.काशी विश्वनाथ महादेव मंदिर व संजीवन समाधी श्री.घाळेप्पा स्वामी महाराज यांची शिवलिंग पिंड असल्यामुळे भाविक भक्त नित्यनेमाने दर सोमवारी येत असतात. वर्षभरात भजन, कीर्तन, प्रवचन, भारुड, कुस्त्या, भंडारा, भागवत कथा, पालखी सोहळा, महाप्रसाद इत्यादी कार्यक्रम होत असतात. गाव जेवणाचे, गाव भंडाऱ्याचे कार्यक्रमही नित्यनेमाने ठरलेले असतात. दर सोमवारी भाविक भक्तांकडून फळ वितरण, विविध अल्पोहराचे वितरण केले जातात.

Post a Comment

0 Comments

जाहिरात