Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

उत्तर प्रदेश येथून घरात न सांगता निघून आलेल्या एका तरुणास ग्रामीण पोलिसांनी दिले नातेवाईकांच्या ताब्यात

उत्तर प्रदेश येथून घरात न सांगता निघून आलेल्या एका तरुणास ग्रामीण पोलिसांनी दिले नातेवाईकांच्या ताब्यात

  
15 ऑगस्ट रोजी घरात कोणालाही न सांगता निघून गेला होता

उदगीर:तालुक्यातील कुमठा येथे एक अनोळखी युवक रेल्वे रुळावरून अनवाणी पायी जात असताना कुमठा येथील एका युवकांने त्याला हटकले व विचारपूस केली असता तो युवक हिंदी भाषेत बोलत होता त्याला मराठी भाषा येत नव्हती त्याची आधीक चौकशी केली असता तो उत्तरप्रदेश येथील असल्याचे सांगितले असता या युवकांची माहिती उदगीर ग्रामीण पोलिसांना देण्यात आली.माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक नाना शिंदे यांनी त्या तरुणास 18 ऑगस्ट रोजी ताब्यात घेऊन चौकशी करून तरुणांच्या घराकडे मोबाईलवर संपर्क साधून सदरील तरुणांची माहिती त्याच्या कुटुंबांना दिली असता तरुणांच्या भावाने मी येईपर्यंत आपल्या ताब्यात ठेवावे असे उदगीर ग्रामीण पोलिसांना सांगितले अमित श्रीअनिल पटेल वय वर्ष 27  राहणार दुग्धेश्वरनाथ ता रुद्धपुर जि दैवरिया राज्य उत्तरप्रदेश हा तरुण 15 ऑगस्ट रोजी राहत्या घरातून कोणालाही काही न सांगता मित्रांसोबत कामानिमित्त पुणे येथे आला होता, पुणे येथून तो मित्राला न सांगता तेथूनही निघून गेला होता असी माहिती सदरील युवकांचे लहान भाऊ अंकेत श्रीअनिल पटेल यांनी उत्तर प्रदेश येथून येऊन उदगीर ग्रामीण पोलिसांत दिली असता युवकांची पूर्णपणे चौकशी करून ग्रामीण पोलिसांनी  सदरील युवकांस अंकेत श्रीअनिल पटेल यांच्या ताब्यात 19 ऑगस्ट रोजी रात्री देण्यात आले यावेळी पोलीस नाईक नाना शिंदे,पोलीस नाईक घारोळे,पोलीस नाईक तिडोळे यांच्यासह ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments

जाहिरात