उदगीर तालुक्यातील ८ महसुली मंडळात फेरफार अदालतीत २६७ पैकी १७८ फेरफार निकाली..
उदगीर तालुक्यातील वाढवणा (बु), हेर, तोंडार, नागलगाव, देवर्जन, नळगीर, मोघा आणि उदगीर या आठ महसुली मंडळात मंगळवारी (२८ नोव्हेंबर) जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांच्या संकल्पनेतून व उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे व तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत उदगीर मंडळाची निडेबन ग्रामपंचायतीत फेरफार अदालत घेण्यात आली. या अदालतीत ८ मंडळात एकुण २६७ फेरफार प्रकरणे ठेवण्यात आली होती. तर १७८ फरेफार प्रकरणे निकाली काढण्यात आली. व ८९ फेरफार तक्रारी प्रलंबित आहेत.
व तसेच वाढवणा (बु), हेर, तोंडार, देवर्जन या चार महसुली मंडळात निवासी नायब तहसिलदार संतोष धाराशिवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत फेरफार अदालत घेण्यात आली. तर नळगीर, मोघा, उदगीर, नागलगाव या चार मंडळात नायब तहसीलदार कौसर अली सय्यद यांच्या प्रमुख उपस्थितीत फेरफार अदालत पार पडली
झालेल्या फेरफार अदालतीमध्ये फेरफारसह सातबारा, आठ नक्कल वितरित करण्यात आले. शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. व तसेच जिल्हाधिकारी लातूर यांच्या संकल्पनेतून अमली पदार्थ विरोधी सप्ताह साजरे करण्याचे आव्हान करण्यात आले. शासनाची सलोखा योजना या विषयीही जनजागृती करण्यात आली. उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांनी अमलात येणारी अपंग व्यक्ती व दुर्धर आजार व्यक्ती या संबंधीची उपाययोजना संदर्भात माहिती दिली. व तसेच पुढील काळात
येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदार नोंदणी. व तसेच निराधार योजना याबाबत ही माहिती यावेळी उपस्थितीताना देण्यात आली. सदर फेरफार आदालत उदगीर उपविभागा अंतर्गत एकूण आठ मंडळ विभागात घेण्यात आले.
यावेळी मंडळ अधिकारी गणेश हिवरे, तलाठी अमोल शेट्टी, देवप्रिय पवार, पंकज कांबळे, बाबासाहेब कांबळे, सरपंच निडेबन जयश्री बेल्हाळे, उपसरपंच फय्याज आतार, सर्व ग्रामपंचायत सदस्य, मादलापूर, बनशेळकी सोमनाथपूर, निडेबन, येथील शेतकरी उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक मंडळ अधिकारी गणेश हिवरे यांनी तर आभार दशरथ शिंदे यांनी मानले.
0 Comments