विठ्ठल रुक्मिणी यात्रे निमित्त दावनगाव येथे जंगी कुस्त्याचा फड रंगला,
शेवटच्या कुस्तीत दावनगाव येथील मल्ल शिंदे यांनी 11 तोळे चांदीचा कडा जिंकला
उदगीर:तालुक्यातील दावनगाव येथे 28 नोव्हेंबर रोजी प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी विठ्ठल रुक्मिणी यात्रेच्या निमित्त समस्त गावकऱ्यांच्या वतीने जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते दावनगाव येथे कुस्ती खेळण्यासाठी सोलापूर,धाराशिव,नांदेड,बीड,परभणी, जालना येथील मल्लानी हजेरी लावली कुस्तीचा आनंद घेण्यासाठी उदगीर तालुक्यातील व दावनगाव परिसरातील लोकांनी गर्दी केली होती शेवटीची कुस्ती हरियाणा येथील मल्ल व दावनगाव येथील मल्लात खेळवली यामध्ये दावनगाव येथील मल्ल शिंदे यांनी विजय मिळवत 11 तोळे चांदीचा कडा जिंकला तर हरियाणा येथील गोलू मल्लाला पराभव पत्करावा लागला गोलू मल्लाला दोन हजार रुपयांचा रोख पारितोषिक देण्यात आला
0 Comments