Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

लातूर- मुरुड- टेंभुर्णी महामार्गाचा चौपदरीकरणाचा प्रश्न नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात उपस्थित करण्याचे आमदार रोहित दादा पवार यांचे आश्वासन

*लातूर- मुरुड- टेंभुर्णी महामार्गाचा चौपदरीकरणाचा प्रश्न नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात उपस्थित करण्याचे आमदार रोहित दादा पवार यांचे आश्वासन 

लातूर:महाराष्ट्राचे युवा नेते आमदार रोहित (दादा) पवार यांच्या नेतृत्वाखाली पुणे ते नागपूर 800 किलोमीटर युवा संघर्ष  यात्रा सुरू झालेंली आहे .सदरील  संघर्ष यात्रा सध्या मराठवाड्यातील जालना परभणी या जिल्ह्यातून प्रस्थान करत आहे. या संघर्ष यात्रेमध्ये युवक ,महिला ,शेतकरी, दिनदलित समाजातील सर्व घटकाबद्दल आवाज उठवला जात आहे. त्या अनुषंगाने दिनांक २५/११ / २०२३ रोजी मंठा जिल्हा जालना येथे लातूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने माननीय रोहित (दादा) पवार व माननीय रोहित (आर आर) पाटील यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर लातूर -मुरुड- टेंभुर्णी मार्ग संदर्भात बेमुदत आमरण उपोषणास उपस्थित राहून पाठिंबा देण्याची विनंती केली. त्या  बद्दलचे निवेदन दिले त्याचबरोबर माननीय आमदार रोहित (दादा) पवार यांना मराठवाड्यातील ज्वलंत प्रश्न लातूर -मुरुड- टेंभुर्णी या महामार्गाच्या चौपदरीकरण संदर्भात संघर्ष योद्धा शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसा पासून बेमुदत आमरण उपोषणा बद्दल व महामार्गाच्या सध्याच्या स्थितीबद्दल माहिती दिली. महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन डिसेंबर महिन्यात नागपुर येथे होत आहे त्या अधिवेशनात लातूर- मुरुड- टेंभुर्णी प्रश्नाबद्दल प्रश्न उपस्थित करू असे आश्वासन त्यांनी दिले .यावेळी श्री संजय शेटे (प्रदेश सचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) श्री मदन काळे (अध्यक्ष लातूर विधानसभा मतदारसंघ ) श्री सोमेश्वर कदम (प्रदेश सचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) श्री भक्तावर बागवान (तालुका कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस  लातूर) श्री परमेश्वर पवार (माजी तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस लातूर) श्रीकांत नगर (तालुका कार्याध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस ) श्री धनंजय देशमुख (माजी कार्याध्यक्ष लातूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस) श्री बालाजी कदम (शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रेनापुर) श्री निशांत वाघमारे (प्रदेश सचिव राष्ट्रवादी युवक काँग्रेस) श्री समाधान गिरी (माजी सरपंच भिसे वाघोली) श्री दत्तात्रय धुमाळ श्री कृष्ण भालेराव त्यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .मंठा  जिल्हा जालना व जिंतूर जिल्हा परभणी असा 25 किलोमीटर प्रवास संघर्ष यात्रे दरम्यान केला

Post a Comment

0 Comments

जाहिरात