Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) पदाकरिता थेट मुलाखत*

*राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) पदाकरिता थेट मुलाखत*

लातूर, दि. 29 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) या पदाकरिता दिनांक 1 डिसेंबर, 2023 रोजी सकाळी 10-00 ते 12-00 या वेळे Walk In Interview एनएचएम सेल, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, लातूर येथे कार्यक्रमातंर्गत 12 रिक्त असलेल्या पदाकरिता थेट मुलाखतीद्वारे घेण्यात येणार आहे. तरी उपरोक्त दिनांकास थेट मुलाखतीकरिता उमेदवारांना उपस्थित राहण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.
15 वा वित्त आयोगातंर्गत शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र -1, एल-3 कार्यक्रमातंर्गत ग्रामीण रुग्णालय -1, एल-2 कार्यक्रमातंर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालय -8, एनयुएचएम उदगीर अंतर्गत अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी-2 .
तसेच वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) या पदाकरिता वरील दिनांकास उमेदवार उपलब्ध न झाल्यास दर महिन्याच्या 1 ते 15 तारखेला Walk In Interview एनएचएम सेल, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, लातूर येथे मुलाखतीसाठी उपस्थित राहण्यासाठी जाहीर सुचना प्रसिध्द करण्यात येत आहे.
तसेच 1 ते 15 तारखेला सुट्टी आल्यास पुढील कार्यालयीन दिवशी Walk In Interview घेण्यात येतील. उमेदवारांनी मुलाखतीस येतांना मुळ कागदपत्रे व एक प्रत झेरॉक्स सोबत घेवून येणे आवश्यक राहील, असे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे एच.व्ही. यांनी केले आहे.

*****

Post a Comment

0 Comments

जाहिरात