उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांना उत्कृष्ठ मतदार नोंदणी पुरष्कार जाहिर,तहसीलदार रामेश्वर गोरेनी केला सत्कार
उदगीर : उदगीर उपविभागाचे कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सुशांतजी शिंदे यांना उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी पुरस्कार 2024 राज्यातील उत्कृष्ट कामगिरी करणारे मतदार नोंदणी अधिकारी म्हणून छत्रपती संभाजी नगर विभागातून प्रथम पुरस्कार जाहिर करण्यात आले आहे.पुरष्कार जाही झाल्याची वार्ता उदगीर विभागात कळताच उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येवून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.सुशांत शिंदे यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी सत्कार केला.यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुंदर बोंदर,गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर,नायब तहसीलदार संतोष धाराशिवकर आदी उपस्थित होते.
0 Comments