महाराष्ट्र वसतीगृह अधीक्षक कर्मचारी संघटनेचा सन्मान सोहळा संपन्न
उदगीर: मधुकरराव एकुर्केकर मित्र मंडळाच्या वतीने कर्मचारी सहविचार सभा व वसतीगृह अधीक्षक कर्मचारी सन्मान सोहळा आचार्य विनोबा भावे विद्यार्थी वसतिगृह उदगीर येथे पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य विनायकराव कांबळे होते.तर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेशाध्यक्ष आयुब शेख ,मारुती कांबळे, लातूर जिल्हाध्यक्ष शामराव सूर्यवंशी, माजी नगरपरिषद सदस्य राजकुमार भालेराव ,भीमशक्ती जिल्हाध्यक्ष संजय काळे, संघटनेचे संस्थापक एकनाथराव एकुर्केकर, मानवाधिकार कार्यकर्ते नितीन एकुर्केकर ,श्रीनिवास एकुर्केकर, भीम आर्मी तालुकाध्यक्ष आकाश कस्तुरे उपस्थित होते . यावेळी लातूर जिल्ह्यातील उदगीर देवणी जळकोट येथून आलेल्या वसतिगृह अधीक्षक व कर्मचाऱ्यांचा मधुकरराव एकुर्केकर मित्र मंडळाच्या वतीने शाल पुष्पहार व सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला .यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले, गेल्या अनेक दशकांपासून वेतनश्रेणीसाठी अविरत चालू असलेला न्याय हक्काचा लढा भविष्यात तीव्र करण्यासाठी संघटित होऊन शासन दरबारी आपल्या मागण्या घेऊन संघर्ष करण्यात येणार असल्याचे यावेळी मान्यवर म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मधुकरराव एकुर्केकर मित्र मंडळाचे अध्यक्ष श्रीनिवास एकुर्केकर यांनी केले.तर कार्यक्रमाचे संचालन व आभार नितीन एकुर्केकर यांनी मानले. यावेळी उदगीर देवणी जळकोट तालुक्यातील वसतीगृह अधीक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments